Amatyaz Developer
Unique Platform for Development
Register

"सीएनएन" या आंतरराष्ट्रीय संस्थेने "हिरो ऑफ द इयर" नारायण

schedule21 May 24 person by visibility 474 category

मदुराईत राहणारा २९ वर्षाचा नारायण हा तरुण एका फायस्टार हॉटेलात शेफची नोकरी करत होता .त्याला युरोपतल्या स्विझ्रलंडला डॉलरमध्ये पगार देणारी नोकरी मिळाली.त्या आनंदात देवदर्शनासाठी जाताना त्याला रस्त्यात एक अंत्यत विकलांग असहाय्य माणूस दिसला ...भुकेने व्याकुळ तो माणूस चक्क कागद खात होता ...ते चित्र अत्यंत विदारक होते ..ते पाहून नारायणचे मन करुणेने भरून आले ..आणि त्याचवेळी त्याने आपले आयुष्य मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकाच्यासाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला...

फायस्टार हॉटेलात नोकरी करणाऱ्या नारायणकडे भरपूर सेविंग होते .त्या पैशाने तो हॉटेल मधून जेवण खरेदी करुन मदुराईतील विकलांग असहाय्य लोकांना पुरवु लागला ..सुरवातीला त्याला घरातून विरोध झाला पण हळूहळू त्याचा हा उपक्रम लोकांच्या लक्षात येवू लागला आणि तेही या उपक्रमात सामील झाले.पुढे नारायणच्या आई-वडीलानीहि त्याला पाठबळ दिले आणि आपले जुने घर त्याच्या ताब्यात दिले ..आता नारायण हॉटेल ऐवजी आपल्या जुन्या घरात मित्राच्या मदतीने जेवण बनवू लागला.२००३ मध्ये त्याने अक्षय ट्रस्टची स्थापना केली ..आज नारायण दिवसातून दोन वेळा ४०० पेक्षा अधिक लोकाचे जेवण बनवतो आणि शहरात फिरून विकलांग असहाय्य लोकांना ते पुरवतो..वेळ असेल तेव्हा तो त्यांचे केस कापणे ,त्यांना अंघोळ घालणे अशी सेवा देखील करतो .. आतापर्यंत त्याने १.५ दशलक्ष लोकाच्या नाश्ता आणि जेवणाची सोय केली आहे .वर्षातील ३६५ दिवस त्याचा हा उपक्रम नित्य चालू असतो.

"सीएनएन" या आंतरराष्ट्रीय संस्थेने "हिरो ऑफ द इयर" या पुरस्कारासाठी आलेल्या जगभरातील २५००० नामांकनामधून पहिल्या दहा जणाच्या यादीत नारायणची निवड केली. परतु नटनट्याची लफडी दिवसभर दळत बसणार्या भारतीय मिडीयाकडुन त्याची उपेक्षाच झाली.

मित्रानो, आजच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रत्येक जण आज पैशाच्या मागे लागलेला आहे. पण आपल्या या देशात नारायण कृष्णनसारखे लोकही आहेत. दुर्दैवाने त्यांच्या कार्याची दखल मिडीया कधी घेत नाहि. त्यामुळे आपणही समाजासाठी काही करावे असं स्वप्न पाहणार्यांची संख्या कमी आहे. माणुसकीचा दिवा तेवत ठेवणाऱ्या नारायणला माझा प्रणाम….

Copyright © 2025. All Rights Reserved by Amatyaz Developer.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id